Monday, 17 August 2015

स्वातंत्र्य ??

मनातले विचार कोणासमोर तरी मांडावेत असं प्रत्येकाला वाटतं त्याप्रमाणे मलाही खुप काळापासून वाटत आलय. त्यातून च मी हां ब्लॉग सुरु करतोय.ईथून पुढे जमेल तेव्हा आणि जमेल तसे लिहित जाईन.

आज 69 वा स्वातंत्र्य दिन.68 वर्षे उलटून गेलीत.या पार्श्वभूमिवर आज आपल्याला मागे आणि त्याच वेळी पुढे निटपने पाहण्याची गरज आहे.
  स्वातंत्र्यानंतरच्या 68 वर्षांमधे भारताने खुप काही कमावल आहे.अनेक क्षेत्रांत देश पुढे गेलेला आहे.शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे,आरोग्याचा सरासरी दर्जा सुधारला आहे,मोठमोठाले उद्योग उभारले आहेत,लोकांचे राहनीमान सुधारले आहे,आणि बरच काही सांगता येईल.पण याचा लाभ नक्की सगळ्यांपर्यन्त पोचला का ?  आजही जे आपण समाजात पाहतो याला खरं स्वातंत्र्य म्हणता येईल का ? असा प्रश्न नक्कीच कोणत्याही सुज्ञ माणसाला पडू शकतो. समाजाचा बराच मोठा वर्ग अजूनही जे जीवन जगतोय ते तर नक्कीच शरमने मान खाली घालायला लावणारे आहे. भौतीक विकास (तोसुद्धा सर्वांचा नाही) मिळवून सगळं काही होत हां समजच मुळात चुकीचा आहे.
महिलांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या हजारो संघटना आजही कार्यरत आहेत हे कशाचे लक्षण आहे ?? आजही दलितांवर,अल्पसंख्यांकांवर,गरिबांवर असे अत्याचार होतात ते ऐकून,पाहुन देश मध्ययुगातून पुढे सरकलाय की तिथेच रुतुन बसलाय हा प्रश्न पडतो.आजही हजारो लोक अंधश्रद्धांच्या बेड्यांत अडकून पडले आहेत यावरून वैज्ञानीक दृष्टीकोणाचा अभाव दिसून येतो.घटनाकारांना अपेक्षित असलेला सामाजिक,राजकीय,आर्थिक न्याय सगळ्यांना मिळालाच नाहिये.

यावर सगळे जण एकच उत्तर देतात की, “राजकारणी आणि काही पक्ष यांच्यामुळेच असं आहे. त्यांची धोरणेच या सगळ्याला कारणीभूत आहेत”. काही प्रमाणात हे जरी खरं असलं तरी त्याच्या पुढे जाऊन विचार केल्यावर असे दिसून येते की हे सगळं बदलून टाकन्याची आपली मानसिकताच कुठे आहे ?

आपलं देशप्रेम म्हणजे 15 ऑगस्ट व् 26 जानेवारीला 2 रुपयांचा तिरंगा घेणे आणि देशप्रेमाचे चार गाणे ऐकतऐकत सुट्टी एन्जॉय करने एवढंच आहे.भलेही काही लोक प्रामाणिक आणि कायद्याने,नितीने वागणारे असतील पण बहुतांश लोक ज्या प्रकारची वागणूक इतरांना देतात ते पाहुन मन विषण्ण व्हायला होतं.

मी एकट्याने काही केल्याने देश बदलनार आहे का ? असा प्रश्न विचारुन ‘जैसे थे’ च सगळं सुरु ठेवणारेच समाजात भरपूर आहेत. रंग दे बसंती मधील एक वाक्य आठवतय-“कोणताही देश Perfect नसतो,त्याला Perfect बनवाव लागतं”. तर आपल्या भारताला Perfect बनवण्यासाठी आपन सगळ्यानी कामसुरु केल पाहिजे. प्रत्येकाने फक्त एकच लक्षात ठेवले तरी खुप म्हणजे खुप काही घडू शकतं. ते म्हणजे आपल्या राज्यघटनेतील “नागरिकांची कर्तव्ये”. ही कर्तव्ये खुपच साधीसोपी आहेत.यांच पालन करण्यासाठी कुठल्याही त्यागाची गरज नहिये.ती खालीलप्रमाणे.-

1.संविधानचे पालन करने,संविधानाने पुरस्कारलेले आदर्श व उभ्या केलेल्या संस्था तसेच राष्ट्रध्वज व् राष्ट्रगीत यांचा आदर करने.
2.राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यास प्रेरक ठरलेल्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरन करने.
3.देशाचे सार्वभौमत्व,ऐक्य व एकात्मता उन्नत राखने व त्यांचे संरक्षण करने.
4.देशाचे संरक्षण व राष्ट्रिय सेवा करण्यास सदैव तयार राहणे.
5.धर्म-भाषा-प्रदेश-वर्ग वगैरे भेद विसरून अखिल भारतीय जनतेत एकोपा व  भ्रातृभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपना आननाऱ्या प्रथा सोडून देने.
6.आपल्या संमिश्र संस्कृतिच्या वारशाचे मोल जाणून तो जतन करने.
7.अरण्ये,सरोवरे,नदया व अन्य जिवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारना करने,सजीव प्राण्यांबाबत भूतदयाबाळगणे.
8.विज्ञान निष्ठ दृष्टिकोण,मानवतावाद,शोधकबुद्धि व् सुधारक वृत्ती यांचा विकास करने.
9.सार्वजनिक संपत्ती चे रक्षण करने,हिंसाचाराचा त्याग करने.
10.आपले राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धि यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदाईक कार्य क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी झटने.
11.6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधि उपलब्ध करून देने.

तर एक सजग,जागरूक, देशप्रेमी नागरिक म्हणून आपन आपली कर्तव्ये पार पाडु. आपला देश आपोआप पुढे जाईल.